मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. गुरुवारी (17 जून) 666, काल (18 जून) शुक्रवारी 762 तर शनिवारी (19 जून) 696 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून 790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 720 दिवसांवर पोहोचला आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 720 दिवसांवर -
मुंबईत आज 696 रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 20 हजार 637वर पोहोचला आहे. आज 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 279वर पोहोचला आहे. आज 790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 88 हजार 340 वर पोहोचली आहे.
14 हजार 751 रुग्ण सक्रिय -
मुंबईत सध्या 14 हजार 751 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 720 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 18 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 82 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 33 हजार 136, तर आतापर्यंत एकूण 67 लाख 86 हजार 802 चाचण्या करण्यात आल्या आहेत. याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ-उतार सुरूच -
1 मे - 3908
2 मे - 3672
3 मे - 2662
4 मे - 2554
5 मे - 3879
6 मे - 3056
7 मे - 3039
8 मे - 2678
9 मे - 2403
10 मे - 1794
11 मे - 1717
12 मे - 2116
13 मे - 1946
14 मे - 1657
15 मे - 1447
16 मे - 1544
17 मे - 1240
18 मे - 953
19 मे- 1350
20 मे - 1425
21 मे - 1416
22 मे - 1299
23 मे - 1431