महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona - आज ६८४३ जणांना कोरोना, १२३ मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या

महाराष्ट्रात आज ६८४३ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. ५२१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. १२३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात राज्यातील कोरोना आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळाले.

maharashtra
maharashtra

By

Published : Jul 25, 2021, 9:15 PM IST

मुंबई - राज्यात गेले काही दिवस कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या रविवारी (१८ जुलै) राज्यात ९ हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन शुक्रवारी ६७५३, शनिवारी ६२६९ नवे रुग्ण आढळून आहेत. आज (25 जुलै) रुग्णसंख्येत वाढ झाली असून ६८४३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी १६७, शनिवारी २२४ मृत्यूची नोंद झाली होती. त्यात घट होऊन १२३ मृत्यूची आज नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.१ टक्के इतका होता. त्यात घट होऊन तो २.०९ टक्के झाला आहे.

५२१२ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज ५२१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,३५,०२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,८४३ नवीन रुग्णाांचे निदान झाले. तर आज १२३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण १,३१,५५२ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६८,४६,९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६४,९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१७,३६२ रुग्ण होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ९४,९८५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला -

सोमवारी १९ जुलैला मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी २० जुलैला त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली. बुधवारी २१ जुलैला त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. गुरुवारी २२ जुलैला त्यात घट होऊन १२० मृत्यूंची नोंद झाली. शुक्रवारी २३ जुलैला पुन्हा मृत्यूसंख्येत वाढ होऊन १६७ मृत्यूची नोंद झाली. त्यावेळी राज्यात मृत्यूदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला होता. शनिवारी २२४ मृत्यूंची नोंद झाल्याने मृत्यूदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला. आज १२३ मृत्यूची नोंद झाल्याने त्यात किंचित घट होऊन २.०९ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३६४
रायगड - २२५
अहमदनगर - ९४३
पुणे - ६५७
पुणे पालिका - २६७
सोलापूर - ४०१
सातारा - ६६५
कोल्हापूर - ५८२
कोल्हापूर पालिका - १७१
सांगली - ६९१
सिंधुदुर्ग - १६२
रत्नागिरी - १९६

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या -

25 जुलै - 6843 नवे रुग्ण
24 जुलै - 6269 नवे रुग्ण
23 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 7302 नवे रुग्ण
21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा -'वादळं, कोरोना, महापूर हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय बघायला पाहिजेत पांढरे आहेत का', राणेंची ठाकरेंवर सडकून टीका

ABOUT THE AUTHOR

...view details