मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज दोन ते तीन हजार रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी 3 हजार 276, रविवारी 3 हजार 206, सोमवारी 2 हजार 432 रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी (28 सप्टेंबर) 2 हजार 844 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 60 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच 3 हजार 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
मंगळवारी राज्यात 2 हजार 844 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 44 हजार 606 वर पोहचला आहे. तर मंगळवारी 60 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 38 हजार 962 वर पोहचला आहे. तसेच 3 हजार 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 65 हजार 277 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे.
हेही वाचा -शिवभोजन थाळी आता मोफत मिळणार नाही, द्यावे लागणार इतके पैसे
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 84 लाख 29 हजार 804 नमुन्यांपैकी 65 लाख 44 हजार 606 नमुने म्हणजेच 11.2 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 54 हजार 985 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 36 हजार 794 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- रुग्ण, मृत्यू संख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 23 सप्टेंबरला 3 हजार 286, 24 सप्टेंबरला 3 हजार 276, 26 सप्टेंबरला 3 हजार 292, 27 सप्टेंबरला 2 हजार 432, 28 सप्टेंबरला 2 हजार 844 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51, 24 सप्टेंबरला 58, 26 सप्टेंबरला 36, 27 सप्टेंबरला 32, 28 सप्टेंबरला 60 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 394
रायगड - 94
अहमदनगर - 457
पुणे - 342
पुणे पालिका - 170
पिंपरी चिंचवड पालिका - 97
सोलापूर- 161
सातारा - 142
सांगली - 118
सिंधुदुर्ग - 85
रत्नागिरी - 82
हेही वाचा -Jalyukt Shivar : तत्कालीन फडणवीस सरकारच्या 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू