मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबईमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मुंबई परिसरात गेल्या २४ तासात १५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईमधील ९ तर मुंबई बाहेरील ६ रुग्णांचा समावेश आहे. मुंबई परिसरात १५ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची एकूण संख्या ७७ झाली आहे. यामधील ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबई परिसरात गेल्या २४ तासात आढळून आलेल्या १५ रुग्णांपैकी ७ रुग्ण हे मुंबईमधील एका रुग्णाच्या सहवासातील आहेत. २ जणांनी यूएईचा प्रवास केला आहे. ठाण्यातील दोन रुग्णांनी युकेचा प्रवास केला आहे. डोंबिवली येथील रुग्णाने तुर्कीचा प्रवास केला आहे. वाशी येथील रुग्णाने युकेचा तर पुणे येथील रुग्णाने यूएईचा प्रवास केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले १२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्या लागोपाठ दोन टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. यामधील ८ रुग्णांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. आज आणखी दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या एकूण १० झाली आहे.
२२३ संशयित रुग्ण भरती -