महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जोगेश्वरीत 140 खाटांच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण; लहान मुलांसाठी आहे विशेष व्यवस्था - Covid Care Center

जोगेश्वरी पश्चिमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने एस.आर.ए. चाँदीवाला इमारतीमध्ये २८० ऑक्सिजन बेड्स असणारे कोरोना केअर सेंटर चालु करण्यात येणार आहे. "डॉक्टर फाँर यू" या संस्थेच्या सहकार्याने या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या १४० बेड संचालित करण्यात येणार आहेत. यापैकी आज ४० बेड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित १०० बेड्स लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

Mayor Kishori Pednekar
जोगेश्वरीत केअर सेंटरचे लोकार्पण

By

Published : May 20, 2021, 8:31 AM IST

मुंबई - कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभुमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या पुढाकारातुन लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था असणारे १४० बेडच्या कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ऑक्सिजन बेड्सही व्यवस्था -

जोगेश्वरी पश्चिमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने एस.आर.ए. चाँदीवाला इमारतीमध्ये २८० ऑक्सिजन बेड्स असणारे कोरोना केअर सेंटर चालु करण्यात येणार आहे. "डॉक्टर फॉर यू" या संस्थेच्या सहकार्याने या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या १४० बेड संचालित करण्यात येणार आहेत. यापैकी आज ४० बेड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित १०० बेड्स लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था -

लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेता, त्यांच्यासाठी ३० बेड याठिकाणी प्रस्तावित असून यापैकी आज २ बेड तयार असल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईमध्ये प्रथमच लहान मुलांसाठी खाट तयार झाली असून लहान मुलांना याठिकाणी खेळणी तसेच मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा - महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांचा होणार खर्च

ABOUT THE AUTHOR

...view details