मुंबई -देशाची आर्थिक राजधानी सध्या कोरोना रुग्णाच्या वाढणाऱ्या संख्येने हॉटस्पॉट झाली आहे. या विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या विभागात, परिसरामध्ये रहिवाशी घेण्यास मज्जाव करत आहेत. मात्र, मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंडमधील एका 35 वर्षीय कोरोना संभाव्य व्यक्तीचा कोरोना अहवाल शनिवारी कस्तुरबा रुग्णालयातून निगेटिव्ह आला. यावेळी घराच्या वाटेवर असताना आसपासच्या राहिवाशांनी केलेल्या अचानक आदराने त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
मानखुर्दमध्ये कोरोना रेपोर्ट निगेटिव्ह आलेली व्यक्ती घरी येताच शेजाऱ्यांनी केले स्वागत - कस्तुरबा रुग्णालय मुंबई
मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड येथील एका ३५ वर्षीय व्यक्ती कोरोना संभाव्य वाटल्याने उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर योग्य उपचारानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर घरी सोडण्यात आले. यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या व्यक्तीचे आदराने स्वागत केले.
राज्यभर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यातच मुंबईत चोवीस तासांत रुग्णांच्या संख्ये शेकड्याने भर पडत असल्याने प्रशासनासह नागरिकांच्याही चिंतेत भर पडत आहे. मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड येथील इमारत क्रमांक 13 मधील एक 35 वर्षीय व्यक्ती कोरोना संभाव्य वाटल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्यास मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे योग्य उपचार होऊत त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले. तेव्हा तो राहत असलेल्या मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड येथील इमारतीजवळ आल्यानंतर इमारतीच्या सर्व रहिवासी लोकांनी त्याचे टाळ्यांमध्ये स्वागत केले. प्रत्येकांच्या टाळ्यांचा आवाज आणि मान सन्मान व एका रहिवासी महिलेने शाल देऊन सत्कारही केला, हे पाहून त्या व्यक्तीचे मन भरुन आले.