महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NEET PG 2023 : नीट पदव्युत्तर नोंदणी सुरू; जाणून घ्या शेवटची तारीख आणि एकूण प्रकिया

नीट पदव्यूत्तर शिक्षण 2023 ची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाली ( Neet PG registration started ) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी रात्री 11:55 पर्यंत आहे. परीक्षा मंडळाचे अर्ज फॉर्म दुरुस्तीचे कामकाज 3 जानेवारीपासून सुरू झाले ( Neet PG registration last date ) आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत त्याचे कामकाज सुरू राहील.

NEET PG 2023
नीट पदव्युत्तर नोंदणी सुरू

By

Published : Jan 8, 2023, 11:25 AM IST

मुंबई : नीट पदव्युत्तर शिक्षण 2023 ची आवश्यक सूचना जारी केली ( Neet PG registration started ) आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस ) ने आज, 07 जानेवारी 2023 पासून राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा - पदव्युत्तर 2023 साठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. उमेदवार एनबीईएमएसच्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर ( NBEMS Official website ) जाऊन आवश्यक सूचना तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

27 जानेवारीपर्यंत फोर्म भरण्याची मुदत :अधिसूचनेनुसार, अर्जाची प्रक्रिया 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सुरू झाली. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी रात्री 11:55 पर्यंत ( Neet PG registration last date ) आहे. परीक्षा मंडळाचे अर्ज फॉर्म दुरुस्तीचे कामकाज 3 जानेवारीपासून सुरू झाले आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत त्याचे कामकाज सुरू राहील. तर अपडेट करण्यासाठी 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान अतिरिक्त संपादन विंडो उघडली ( Neet PG registration detail process ) जाईल.

31 मार्चला निकाल : नीट पदव्युत्तर शिक्षण 2023 चे प्रवेशपत्र 27 फेब्रुवारी रोजी जारी केले जाईल. 5 मार्च रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत परीक्षा घेतली जाईल. 31 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. नीट पदव्युत्तर शिक्षण 2023 ही शैक्षणिक सत्र 2023-24 साठी MD/MS/PG डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकल पात्रता सह प्रवेश परीक्षा आहे. त्यामुळे ही माहिती गरजेची आहे.

नीट परीक्षेसाठीचीवयाची मर्यादा हटवली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवली ( Age Limit for NEET exam removed ) आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी परीक्षेसाठी यंदापासून जनरल कॅटगरीसाठीची 25 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गासाठीची 30 वर्षाची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. नीट परीक्षेसाठी परीक्षार्थीचे किमान वय 17 वर्षे असणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

NEET अंडर ग्रेजुएट परीक्षा 13 भाषांमध्ये : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा NEET अंडर ग्रेजुएट परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार ( NEET Undergraduate Exam in 13 Languages ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details