महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी कुर्ला गँगरेप प्रकरणी पोलीस उपायुक्तांची घेतली भेट - महिला अत्याचार मुंबई

मुंबईतील कुर्ला परिसरात 30 नोव्हेंबर रोजी एका 42 महिलेवर सामूहिक बलात्कार (kurla gangrape case) झाल्याची घडना घडली होती. या प्रकरणी (Neelam Gorhe visited DCP) विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुंबई झोन-५ चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि तपासी अधिकारी यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली.

Neelam Gorhe
डॉ. नीलम गोऱ्हे आणि पोलीस उपायुक्त यांची भेट

By

Published : Dec 6, 2022, 4:32 PM IST

Updated : Dec 6, 2022, 6:51 PM IST

मुंबई : महिलांवरील अत्याचाराचे (Women Atrocities Mumbai) प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच ३० नोव्हेंबरला कुर्ला परिसरातील ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची (Woman Gangrape Mumbai) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी (Neelam Gorhe visited DCP) डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती विधानपरिषद यांनी मुंबई झोन-५ चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि तपासी अधिकारी यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली. (Latest news from Mumbai) तसेच भाभा हॉस्पिटलचे डीन डॉ. डोळस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. (kurla gangrape case)

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पत्र

डॉ. गोऱ्हेंच्या उपायुक्तांना सूचना :यात पोलिसांनी महिलेचा जबाब घेतला असून आवश्यक ती कलमे दाखल केली आहेत. तसेच वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्या अहवालानुसार इतर कलमांचा विचार होईल व कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी डॉ. गोऱ्हे यांना दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी या महिलेचा आत्मविश्वास वाढावा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी सूचना उपायुक्त यांना केली. तसेच पोलिसांनी एक चतु:सुत्री कार्यक्रम राबवावा, अशीही सूचना केली.

राज्य महिला आयोगाचे पत्र

महिला मोहल्ला दक्षता समितीच्या बैठका घेण्याचा आग्रह :याचबरोबर डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांनी त्यांच्या झोनच्या हद्दीत जे गुन्हे घडतात व जे आरोपी जामिनावर सुटले असतील त्यांच्या संदर्भात कठोर कारवाई व्हावी. ज्या अपहरण झालेल्या मुलींना पोलीस शोधून काढतात व परत त्यांना मुख्य प्रवाहात आणतात. त्या मुलीने परत त्या चक्रात सापडू नये यासाठी या मुलींना सायबर साक्षरताचे ज्ञान देणे आवश्यक आहे. ज्या केसेसमध्ये महिलांविरुद्ध ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत त्यांची नोंद घेण्यासाठी एक वेगळी नोंदवही तयार करावी. बीट स्तरावरील महिला मोहल्ला दक्षता समितीच्या बैठका घेण्यात याव्यात. तसेच ज्या केसेसचे बी समरी रिपोर्ट झालेले आहेत त्या केसेसचा आढावा घ्यावा,अशा सूचना पोलीस उपायुक्तांना दिल्या.यावर उपायुक्त मनोज पाटील यांनी या सर्व सूचनांची नोंद घेत संपूर्ण झोनमध्ये याप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात यावा :राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने शक्ती कायदा पारित करून केंद्राकडे पाठवला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात यावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंतीही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी राज्य सरकारला केली.

Last Updated : Dec 6, 2022, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details