महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Neelam Gore Ordered : औरंगजेबाचे उदात्तीकरण येणार अंगलट; तडीपारची कारवाई करा - सभापती नीलम गोऱ्हे यांचे आदेश - मंत्री चंद्रकांत पाटील

औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपोषणात औरंगजेबाचे फोटो झळकविण्यात आलो होते. याविरोधात सखोल चौकशी करून एमपीडीए अंतर्गत तडीपारची कारवाई करावी, असे आदेश विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

Neelam Gore Ordered
नीलम गोऱ्हे

By

Published : Mar 8, 2023, 3:10 PM IST

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे उदात्तीकरणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे प्रकार निंदनीय आणि चिड आणणारे आहेत. राज्य सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून धागेदोरे तपासावेत. वेळ पडल्यास एमपीडीए अंतर्गत तडीपारची कारवाई करावी, असे आदेश विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत.



विरोधकांनी केली कारवाईची मागणी : छत्रपती संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. वादग्रस्त विधाने करून लोकांमध्ये चीड निर्माण केली जात आहे. आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

कारवाई करण्याची मागणी : संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत उत्तर दिले. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्यापासून अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. बहुतांश त्यातील चीड आणि संताप आणणारे आहेत. बारकाईने याकडे पाहिल्यास देशद्रोही ठरेल, अशी विधाने आहेत. सरकारकडून या आक्षेपार्ह बाबीची गंभीर दखल घेतली जाईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


एमपीडीए अंतर्गत कारवाई करा : छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकवले जात आहेत. हा प्रकार निंदनीय असून चिड आणणार आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी सुरू आहे. सरकारने हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकारी नेमून याबाबतचे धागेदोरे तपासा. लोकांचे संयम सुटणार नाही याची काळजी घ्या. वेळ पडल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी, अशा सूचना सभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा : Sanjay Raut: हक्क भंगाची कारवाई; त्या विशिष्ट गटासाठी चोर हा शब्द अतिशय योग्य, राऊत आपल्या विधानावर ठाम

ABOUT THE AUTHOR

...view details