महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कलेक्टर जमिनीवरील धोकादायक इमारतीबाबत ठोस निर्णयाची गरज - महापौर - Malad building accident

कलेक्टर जमिनींवरील धोकादायक इमारतींचा प्रश्न आहे. पालिकेने याबाबत कलेक्टरांना निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र जबाबदारी कोणाची? असा प्रश्न समोर आला होता. जे अनधिकृत आहेत यावर कारवाई करू. अधिकाऱ्यांनी राजकीय लोकांच्या दबावास बळी न पडता कारवाई करणे आवश्यक आहे.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर

By

Published : Jun 10, 2021, 2:09 PM IST

मुंबई- मालाड (मालवणी) येथे घर कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना कलेक्टरच्या जमिनीवर घडली आहे. कलेक्टर जमिनीवरील धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यावर कारवाई करण्यास कलेक्टरांना सांगण्यात आले आहे. अशा इमारतींबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

ठोस निर्णयाची गरज

महापौर किशोरी पेडणेकर
मालाड दुर्घटनेबाबत बोलताना, ही घटना कलेक्टर जमिनीवर घडली आहे. याबाबत बैठक घेतली होती. कलेक्टर जमिनींवरील धोकादायक इमारतींचा प्रश्न आहे. पालिकेने याबाबत कलेक्टरांना निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र जबाबदारी कोणाची? असा प्रश्न समोर आला होता. जे अनधिकृत आहेत यावर कारवाई करू. अधिकाऱ्यांनी राजकीय लोकांच्या दबावास बळी न पडता कारवाई करणे आवश्यक आहे. कोरोना काळात अनधिकृत बांधकाम झालं आहे. यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे असे महापौर म्हणाल्या.कोरोनाचा आकडा लपवत नाही मुंबईत कुठेही कोरोना मृतांचा आकडा लपवला जात नाही. मुंबईत कोणती नदी नाही. त्यामुळे योग्य नोंदणी पालिकेकडून केली जात आहे. असा टोला महापौरांनी भाजपाचे नाव न घेता लगावला. हे काही दूधाने धुतलेले आहेत का? असा प्रश्न विचारत भाजप काय म्हणतय त्यांना बोलू दे असे मत महापौर यांनी व्यक्त केले आहे.विरोधकांच्या अंगात वारा भरतोमुंबईत पाऊसाचे पाणी भरले की विरोधकांच्या अंगात वारा भरतो. काल पाऊस थांबला की पावसाचे पाणी साचन थांबले. पालिकेने योग्य नियोजन केले होते असे महापौर यांनी सांगितले.

हेही वाचा- वाढदिवस ठरला घातवार, नाशिकच्या वालदेवी नदीत ६ मित्रमैत्रिणी बुडाले

ABOUT THE AUTHOR

...view details