महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या दोन माजी पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह ट्विट.. संबित पात्रांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल - sambit patra meme on congress

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनाच्या संदर्भात पुन्हा एकदा एक आक्षेपार्ह हे ट्विट करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेसच्या काळात कोरोना आला असता तर कोणकोणत्या प्रकारचे भ्रष्टाचार झाले असते, असा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.

संबित पात्रा ट्विटर
संबित पात्रा ट्विटर

By

Published : May 12, 2020, 12:58 PM IST

मुंबई - राजकारण आणि समाजकारण यावर अनेकदा बेताल वक्तव्य करून कायम चर्चेत राहणारे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनाच्या संदर्भात पुन्हा एकदा एक आक्षेपार्ह हे ट्विट करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेसच्या काळात कोरोना आला असता तर कोणकोणत्या प्रकारचे भ्रष्टाचार झाले असते, असा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आज संबित पात्रा विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पात्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात कोरोना आला असता तर किती कोटी रुपयाचा घोटाळा झाला असता याची आकडेवारी आणि काँग्रेस नेत्यांच्या फोटोवर त्याची आकडेवारी देत हे पोस्टर घराघरापर्यंत पोचवा, असे आवाहन केले आहे.

आज संपूर्ण देश कोरोना सारख्या गंभीर महामारीचा सामना करत आहे, केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन लागू केल्यामुळे हजारो कामगार रस्त्यावर उतरून आपआपल्या घरी पायी निघाला आहे. मजूर, महिला, लहान मुले उन्हामध्ये अनवाणी चालत प्रवास करत आहे, या गंभीर संकटाचा सामना करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याने जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. त्यामुळेच भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहलाल नेहरू व राजीव गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान ट्विटरद्वारे केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निषेध महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस करते, तसेच याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये केली असून अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त यांनी दिली.

ब्रिजकिशोर दत्त, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस

ABOUT THE AUTHOR

...view details