महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादीचे दोन दिवस शिबीर, निवडणुकांसाठी ठरविणार रणनीती - NCPs strategy for upcoming elections

स्थानिक स्वराज्य संस्था ( Local Self Government ) आणि मनपा निवडणुकी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर ( Two day camp of NCP ) शिर्डीत पार पडत आहे.

NCP Sharad Pawar
दोन दिवसीय शिबिरात राष्ट्रवादीची होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी ठरणार रणनीती

By

Published : Nov 3, 2022, 7:15 AM IST

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था ( Local Self Government ) आणि मनपा निवडणुकी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर ( Two day camp of NCP ) शिर्डीत पार पडत आहे. ग्रामपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकात ( Gram Panchayat and Municipal Council Elections ) यश मिळाले. मात्र त्यावेळी पक्ष सत्तेत होता. आता सत्तेतून पायउतार झाल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत यश अबाधित ठेवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.


नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार आणि पाच नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय शिबिर भरवण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून पक्षाने केलेली उन्नती त्यासोबत राज्यभरात पक्षाने केलेला विस्तार याबाबत चर्चा होणार आहे. तसेच भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड कशी असेल याबाबतही धोरण आखले जाणार आहे. नुकतेच राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतरामुळे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली उतरावे लागले. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा देखील एक प्रमुख पक्ष होता. सत्तांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील सत्ता गेली असली तरी, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले होते. या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबाबत देखील या दोन दिवसीय शिबिरामध्ये चर्चा केली जाणार आहे.

दोन दिवसीय शिबिरात राष्ट्रवादीची होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी ठरणार रणनीती


होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिबिरात ठरणार रणनीती :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. या दोन दिवसात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मात्र या सोबतच शरद पवार यांच्याकडून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा या नेत्यांबरोबर केली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला यश प्राप्त झालं होतं. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नाही याचा परिणाम होऊ घातलेल्या निवडणुकांवर होईल का? किंवा तो परिणाम होऊ नये यासाठी नेमकं काय करावे लागेल याबाबत देखील शरद पवार शिबिरातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे चार आणि पाच नोव्हेंबरला शिर्डीत होणार शिबीर राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.



भाविकास आघाडीवर होणार शिक्कामोर्तब :राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं. मात्र अडीच वर्षानंतर हे सरकार कोसळलं तरीही होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्मुला राबवता येईल का ? याबाबत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत असताना ग्रामपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळालं होतं. मात्र अद्याप होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी मधून निवडणुका लढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी बाबत स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही असे तीनही पक्षांकडून सांगितलं जात आहे. पण होऊ घातलेल्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात याव्यात असे संकेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहेत.

स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा केली जाणार :आघाडी करत असताना स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल असेही स्पष्ट करण्यात आल आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरात राज्यात जेथे जेथे निवडणुका होणार आहेत. तेथील स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी सोबत गेल्यास त्याचा फायदा होईल का नाही? याबाबतची चाचपणी या शिबिरातून घेतली जाईल. आणि त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बाबत शिक्कामोर्तब केला जाईल. राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुका या महाविकास आघाडी मधूनच लढाव्यात अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असली तरी स्थानिक पातळीवर नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय याबाबतचा कोणताही निर्णय होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले आहे.


राष्ट्रवादीला होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये यश मिळण्याचे संकेत :नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि त्याआधी झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. तसेच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी आशा पक्षाला आहे. मात्र शरद पवार हे राज्यातील नाहीतर उद्देश पातळीवरचे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळे कोणत्याही वातावरणात तसेच कोणत्याही लाटेत आपल्या पक्षाला कमी फटका बसेल किंवा त्यात वातावरणाचा आपल्या पक्षाला फायदा होईल याबाबत शरद पवार चाणाक्ष असतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीचे सरकार होतं हे पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर होती.

अडीच वर्ष का होईना पक्ष सत्तेत राहिला : महाविकास आघाडी तयार करून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आली अडीच वर्ष का होईना, पण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला. या सत्तेच्या माध्यमातून राज्यभरात कानार्कोपऱ्यात आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. अडीच वर्षाच्या सत्तेत आपल्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बळकटी दिली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाले. त्याच मानाने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांमध्ये देखील चांगले यश प्राप्त होईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बांधणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये नेमकी कोणती रणनीती असावी याबाबत शिर्डीत होणाऱ्या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा आणि त्यानंतरच महाविकास आघाडीचा निर्णय घेतला जाईल असे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पूरो ( Political analyst Praveen Puro ) यांनी व्यक्त केला आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details