मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन राज्यातील निवडणुका संदर्भात काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले. मांडलेल्या मुद्यावर निवडणूक आयोग सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले. निवडणुकांच्या तारखा निश्चित करताना दिवाळीच्या सुट्टीत लोक गावी जातील याचा परिणाम मतदानावर होवू शकतो, त्यामुळे याचा विचार करण्यात यावा, असे नवाब मलिक म्हणाले.