मुंबई - संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. बरेच कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासाठी नुकतीच केंद्र सरकारने आरोग्य विम्याची सोय केली. मात्र, वैद्यकीय विद्यार्थी आणि इंटर्न्स देखील या कोरोनाच्या लढ्यात मदत करत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो, त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने त्यांना देखील सुरक्षा मिळावी यासाठी खासदार शरद पवार आणि सरकारकडे ईमेल आणि ट्विट करत विनंती केली आहे.
कोरोना : वैद्यकीय विद्यार्थ्यांसह इंटर्न्सनाही आरोग्य विमा मिळावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी - कोरोना मुंबई न्यूज
वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आरोग्य विम्याची सोय केली. मात्र, वैद्यकीय विद्यार्थी आणि इंटर्न्स यांना देखील विम्याची सोय मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने सुरक्षा विमा दिला, तसा वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि इंटर्नना देखील मिळावा यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांनी जे 'वैद्यकीय विद्यार्थी आणि इंटर्न्स सरकारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत, त्यांची महाराष्ट्र सरकारने नैतिक जबादारी घेऊन स्वखर्चाने आरोग्य विमा काढावा, अशी सूचना माननीय शरद पवार साहेब ह्यांनी सरकार ला करावी, अशी विनंती केली आहे.