मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी दुपारी दक्षिण मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. त्यामुळे ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर, 'मी साहेबांसोबत' या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या मोहिमेला प्रतिसाद देत राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमचं ठरलंय.. 'मी साहेबांसोबत'च राहणार, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया - मी साहेबांसोबत मोहीम बातमी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार हे बेलोरा येथे असलेल्या ईडी कार्यालयाला स्वेच्छेने भेट देणार असून, या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यभरातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
'मी साहेबांसोबत'च
शरद पवार हे दुपारी दोनच्या सुमारास बेलोरा येथे असलेल्या ईडी कार्यालयाला स्वेच्छेने भेट देणार असून, या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यभरातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, जमावबंदी केली असली तरी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोक, ही दडपशाही योग्य नाही - नवाब मलिक