महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिहारची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार - प्रफुल पटेल - बिहार निवडणुका बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूक स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल

By

Published : Oct 13, 2020, 6:24 PM IST

Updated : Oct 13, 2020, 7:37 PM IST

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली.

बोलताना प्रफुल्ल पटेल

बिहार निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र मिळून निवडणुका लढवतील, अशी चर्चा मागील काही दिवसात सुरू झाली होती. पण, पटेल यांनी आज (दि. 13 ऑक्टोबर) त्याबाबत नकार देत राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती. आम्ही जास्त जागांसाठी आग्रहीदेखील नव्हतो. पण, एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

एकत्र येऊन भाजप व जदयूचा मुकाबला केला पाहिजे, असे एकीकडे म्हणतात. मात्र, दुसरीकडे इतर पक्षांना महत्त्व देत नाहीत, ही काँग्रेसची भूमिका दुर्दैवी असल्याची खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा -ईटीव्ही स्पेशल : मेट्रो-6 आणि कांजूर कारशेड अडीच वर्षांत होणार पूर्ण

Last Updated : Oct 13, 2020, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details