महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुर्ल्यात पोलिसांवरील हल्ल्यामागे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा हात - नवाब मलिक - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी चेंबूर येथील तोडफोड आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबाबत भाजपच्या स्थानिक नेत्याला जबाबदार धरले आहे.

नवाब मलिक

By

Published : Oct 22, 2019, 9:44 PM IST

मुंबई - चेंबूर परिसरात घडलेल्या घटनेला भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे. मंगळवारी एका अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेत पाच पोलीस जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

निवडणुकीच्या काळात गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात पद्धतशीरपणे लोकांना चिथावणी दिली जात होती. भाजपचे स्थानिक नेते हे राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे आजचा प्रसंग घडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

कुर्ला येथे राहणाऱ्या पांचाराम रिठाडीया यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास व्यवस्थित होत नसल्याने पांचाराम रिठाडीया यांनी आत्महत्या केली होती. आज त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला हजारो लोकांची गर्दी जमली होती. त्यावेळी जमाव संतप्त झाला आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना यात मारहाण करण्यात आली असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा - साताऱ्यातील नवले गावात नवलाई, घड्याळासमोरील बटन दाबले की मत कमळाला !

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details