मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाणार असल्याने कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या परिसरात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पवारांच्या समर्थनार्थ असलेल्या कार्यकर्त्यांना रात्रीपासूनच पोलीस अटक करत असल्याने ही दडपशाही योग्य नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.
आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोक, ही दडपशाही योग्य नाही - नवाब मलिक
शरद पवार दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र, काल रात्रीपासूनच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. तर, आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोकं आहोत. ही दडपशाही योग्य नाही अशा शब्दांत नवाब मलिक यांनी टीका केली आहे.
नवाब मलिक

हेही वाचा - 'केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम झाल्याने पीएमसीचे संकट'
Last Updated : Sep 27, 2019, 12:37 PM IST