महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सरकारच्या जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी' - nawab malik on modi government

एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावरच बोलताना नवाब मलिक यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

By

Published : Oct 10, 2019, 6:06 PM IST

मुंबई - सरकारच्या जिओवर असलेल्या प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी दिला जात आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.

एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावरच बोलताना नवाब मलिक यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

पंतप्रधान मोदी देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत आहेत. देशाच्या जनतेने हे कारस्थान ओळखून त्यांना घरी बसवण्याचा निर्णय घ्यायला हवा, असे आवाहनही नवाब मलिक यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details