मुंबई - सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्रीय गुन्हे अन्वेषन (सीबीआय) विभागाला संशय असेल तर चौकशी किंवा छापे टाकू शकतात. शिवाय गुन्हा दाखल करू शकते. परंतु, पहिल्या दिवसापासून ज्या पध्दतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे, यावरून हे राजकारणच सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक
आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यातील सर्व रुग्णालयांचे होणार ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’; मुख्य सचिवांचे निर्देश
कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. अनिल देशमुख यांनी सुरूवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता. याबाबतचा NIA ने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.