मुंबई :अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आहे. शपथविधीपूर्वी अजित पवार यांनी एक बैठक घेतली ज्यात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल दोघेही उपस्थित होते. यामुळे अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा पाठिंबा आहे की नाही, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध सेना म्हणजे उद्धव ठाकरे सेना विरूद्ध एकनाश शिंदे सेना झाली आहे. तशी आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार विरूद्ध शरद पवार होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
भाजप शिंदे सरकारसोबत हातमिळविणी :अजित पवार यांनी भाजप शिंदे सरकारसोबत हातमिळविणी केली आहे, त्यास राष्ट्रवादीने अधिकृतपणे पाठिंबा दिल्याचे अजून समोर आलेले नाही. अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी सुमारे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सेना विरूद्ध सेना हा संघर्ष जसा झाला, तसा आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार आणि शरद पवार यांच्यात देखील फूट पडणार का हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, जर असे झाले तर शरद पवार यांना 2024 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी हा मोठा धक्का असेल.