महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nilesh Rane vs Sharad pawar : निलेश राणेंकडून शरद पवारांची तुलना; अमोल मिटकरींनी दिले सणसणीत उत्तर - नेते अमोल मिटकरी यांचे निलेश राणेंना प्रत्युत्तर

भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे. ट्विटच्या माध्यमातून जहरी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीचा स्क्रीन शॉटसह निलेश राणे यांनी शरद पवार यांना उद्देशून ट्विट केले आहे.

निलेश राणे यांची शरद पवार यांच्यावर टीका
निलेश राणे यांची शरद पवार यांच्यावर टीका

By

Published : Jun 8, 2023, 11:45 AM IST

Updated : Jun 8, 2023, 2:55 PM IST

अमोल मातेले

मुंबई : देशातील मुस्लीम आणि ख्रिचन समाजाविषयी चिंता वाटावी अशी स्थिती असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे. निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून जहरी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीचा स्क्रीन शॉटसह निलेश राणे यांनी शरद पवार यांना उद्देशून ट्विट केले आहे. यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काकासाहेब कुलकर्णी

निलेश राणेंचे ट्विट : निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार असे ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे.

मिटकरींचे राणेंना प्रतित्तुर : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश राणेंना सणसणीत उत्तर दिले आहे. मिटकरी यांनी ट्विट करत निलेश राणेंची कानउघडणी केली आहे. आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस! तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा

काय होते शरद पवार यांचे वक्तव्य : शरद पवार यांनी औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राज्यातील दंगली, हिंसाचार आणि लव्ह जिहाद या घटनांवर भाष्य केले. देशात मोठे प्रश्न असताना या फाजील प्रश्नांना आपण महत्त्व देत नसल्याचे शरद पवार म्हणाले होते.

ओरिसात आणि देशातील काही राज्यांमध्ये चर्च वरती हल्ले झाले आहेत. त्यामुळे देशातील ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाविषयी चिंता वाटते. ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय समाज असतो. कोणी साक्ष घ्यावी त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ले करण्याची गरज काय. मुस्लीम समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक भेदभाव करत कटुता निर्माण केली जात आहे. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष

औकातीप्रमाणे टीका केली पाहिजे - काकासाहेब कुलकर्णी : निलेश राणे यांना काँग्रेस पक्षाकडूनही उत्तर दिले जात आहे. निलेश राणे यांच्या ट्विटवर काँग्रेसचे नेते काकासाहेब कुलकर्णी यांनी उत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्यावर ज्याप्रकारे निलेश राणे यांनी स्टेटमेंट दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुरोगामी विचाराचे नेते आहेत. पवारांची तुलना औरंगजेबासोबत केले हे अतिशय निंदनीय आणि चुकीचे आहे. संविधानावर दे चालतो. देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. निलेश राणेंचे स्टेटमेंट धक्कादायक आणि विद्रोही विचारच. आपल्या बुद्धीप्रमाणे आणि औकातीप्रमाणे टीका केली पाहिजे. लायकीपेक्षा जास्त टीका करत आहे. शरद पवार हे सूर्यासारखे आहे, त्यामुळे सूर्यावर थुंकणे म्हणजे स्वतःच्या तोंडावर थुंकण्यासारखा आहे. यापुढे विचारपूर्वक स्टेटमेंट करावे. -काँग्रेसचे नेते काकासाहेब कुलकर्णी

शरद पवारांचा इतिहास वाचूनच स्टेटमेंट करावे : ज्यांची राजकीय उंची कमी आहे, असे देखील शरद पवारांवर टीका करत आहेत. मूळ मुद्द्याहून जनतेची दिशाभूल करण्यासाठी,जातीय दंगली घडवण्याचं काम भाजपा राजरोसपणे करत आहे. मुंबई 1992-93 साली झालेल्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्वाची भूमिका शरद पवारांनी बजावली होती. हा इतिहास देखील टीका करणाऱ्यांनी वाचून घेऊन स्टेटमेंट करावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमोल मातेले यांनी दिली आहे.

हेही वाचा-

  1. Rane v. Thackeray : 'मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात', निलेेश राणेंचे वादग्रस्त ट्विट
  2. गरजेची पदं फक्त ठाकरे कुटुंब घेणार, बाकीच्यांनी चटया उचलायच्या - निलेश राणे
Last Updated : Jun 8, 2023, 2:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details