मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांंच्या निवास्थानी पोहचले आहे. पवार शिंदे यांच्या भेटीमागचे कारण अद्यप समजू शकले नाही. मात्र, शिंदे पवार भेटीने अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत. मराठ मंदिर संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे 35 मिनिटे चर्चा झाली आहे. येत्या 24 जून रोजी मराठा मंदिर संस्थेचा अमृत मोहत्सव कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर पवार माध्यमाशी संवाद साधण्याची शक्याता वर्तवण्यात येत होती. मात्र, भेटीनंतर पवारांनी माध्यमांच्या प्रितिनिधींशी बोलणे टाळले आहे.
मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली - शरद पवार - अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राजकीय वर्तुळात खळबळ :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा यांच्या बंगल्यावर आले. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार अचानक पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागे काही मुद्द्यावर चर्चा आहे की अन्य काही राजकीय कारण आहे, अशी चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीत सहभागी असलेले उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रात नाहीत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सध्या देशाबाहेर असताना शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळाचा अद्याप झालेला विस्तार आणि ईडीकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरू असलेली चौकशी या मुद्द्यावरही ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गौतम आदानी शरद पवारांच्या भेटीला :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उद्योगपती गौतम आदमी यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक येथे जाऊन भेट घेतली आहे. भेट नेमकी कशा संदर्भात घेतली आहे याविषयी माहिती मिळू शकली नाही परंतु पवारांची आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्योगपती आदानी यांनी शरद पवारांच्या भेटीची जो टायमिंग साधला आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री भेट. त्यानंतर लगेच शरद पवारांच्या भेटीला उद्योगपती अदानी त्यामुळे या दोन भेटीचे काही कनेक्शन आहे यावर आता चर्चा सुरु झाल्या आहे.तब्ब्ल 30 मिनिटे अदानी आणि पवार यांच्यात चर्चा झाली.