माहिती देताना प्रफुल्ल पटेल मुंबई - शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. रविवारीही आम्ही शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, रविवारी अनेक आमदार या बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आम्ही सर्व आमदारांना घेऊन आज पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच पक्ष एकसंघ राहावा यासाठी आम्ही शरद पवार यांना विनंती केली आहे, अशी माहिती अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
पक्ष एकसंघ राहण्यासाठी आम्ही रविवारीही शरद पवार यांच्याकडे विनंती केली होती. आजही भेटीवेळी हीच विनंती आम्ही शरद पवार यांच्याकडे केली आहे. मात्र, दोन्हीवेळी शरद पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच अद्याप कोणतीही भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही - प्रफुल्ल पटेल, नेते, अजित पवार गट
पक्ष एकसंघ राण्यासाठी विनंती - राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी सोमवारी पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली आहे. याभेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही रविवारीही शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, काल अनेक आमदार गैरहजर होते. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व आमदार मुंबईत आले आहेत. या सर्व आमदारांना घेऊन आम्ही आज पुन्हा शरद पवार यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले आहेत. तसेच पक्ष एकसंघ राहण्यासाठी शरद पवार यांना विनंती केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
शरद पवारांची नो कमेंट - राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी रविवारी तसेच सोमवारीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. दोन्हीवेळी शरद पवार यांची वेळ न मागता या सर्व बंडखोर नेत्यांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये थेट भेट घेतली. याभेटीमध्ये राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती या सर्व बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे दोन्हीवेळी केली. मात्र, या दोन्हीवेळी शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया या नेत्यांना दिली नाही. याबाबतची माहिती स्वत: प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनीही दिली आहे.
हेही वाचा -
- NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह आमदार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
- Rohit Pawar : विधानसभा विरोधी पक्षनेता निवड; आमदार रोहित पवारांनी केली 'ही' मागणी
- Maharashtra Monsoon Session : नव्या संदर्भात नीलम गोऱ्हेंच्या उपसभापतीपदावर विरोधकांचा आक्षेप, विरोधकांचा सभात्याग