मुंबई NCP Crisis :शरद पवार गटातील नोटीस पाठवलेल्या आमदारांमध्ये अनिल देशमुख, सुनील भुसार, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे. यापूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना नोटीस पाठवण्यात आली होती. पण अशोक पवार, मानसिंग नाईक आणि नवाब मलिक यांना मात्र अद्याप नोटीस मिळालेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर अजित पवार गटानंदेखील दावा केल्यामुळं खरा पक्ष कोणाचा यावर न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. तसंच पक्षविरोधी कृती केल्यामुळं आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका अजित पवार गटानं विधीमंडळात दाखल केली. दरम्यान, या संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळानं शरद पवार गटातील 8 आमदारांना नोटीस पाठवली आहे. तसंच या आमदारांना 8 दिवसांत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अजित पवार गटाच्या 30 आमदारांना नोटीस : ज्याप्रकारे शरद पवार गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस बजावण्यात आलीय. त्याच प्रकारे अजित पवार गटाच्या 30 आमदारांना देखील शरद पवार गटाच्या अपात्रतेच्या याचिकेवरून नोटीस बजावण्यात आलीये. तसंच अजित पवार गटाच्या आमदारांनादेखील आपलं म्हणणं मांडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी देण्यात आला.
काेण मारेल बाजी :दरम्यान, एकीकडं शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अंतिम टप्प्यात असून दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गट आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधातील याचिकेच्या माध्यमातून विधिमंडळात आमने-सामने येऊन ठेपले आहे. त्यामुळं आता या लढाईत कोणता गट बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच याच निर्णयावर आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा -
- Sharad Pawar Ajit Pawar Meeting : काका-पुतण्यांचे चोरी चोरी चुपके-चुपके; नेमकं शिजतंय काय?
- Sharad Pawar With BJP : मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सांगतो...; भाजपासोबत जाण्याच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण
- Ajit Pawar On NCP Dispute : विरोधक आमच्या नावावर बिल फाडून बदनामी करतात, अजित पवारांचा हल्लाबोल; राष्ट्रवादी कोणाची यावर म्हणाले...