प्रतिक्रिया देताना जयंत पाटील मुंबई - राष्ट्रवादीसोबत बंड करत अजित पवार हे शिंदे-फडणवीस गटात सामील झाले. सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले तर अन्य 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन त्यांना खातेवाटपही झाले आहे. या सर्व मंत्र्यांनी रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी या सर्व मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आहे. तसेय या सर्व प्रकरणावर चर्चा करुन तोडगा काढण्याची विनंतीही शरद पवार यांच्याकडे केली आहे. मात्र, शरद पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
मंत्र्यांची शरद पवारांसोबत चर्चा - राष्ट्रवादीच्या बंड केलेल्या 9 मंत्र्यांनी रविवारी शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील हजर होते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे हे नेते या बैठकीला उपस्थित होते.
चर्चा करुन निर्णय घेणार -राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी या सर्व मंत्र्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंती या सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अद्याप शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या सर्व विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत. तसेच या चर्चेनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षाचा कार्यभार काँग्रेसकडे - सोमवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. याआधी राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादीकडे होते. मात्र, बंडानंतर राष्ट्रवादीकडील संख्याबंळ कमी झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुरुच आहे. यावर रविवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे देण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. आम्ही फक्त आता कागदावरच सर्वात मोठा पक्ष आहोत. खरी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे दिली असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Maharashtra Political crisis : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट
- Monsoon Session 2023: पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरून ठरणार वादळी; पक्षांच्या फोडाफोडीनंतर विरोधक आक्रमक