महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLC Elections NCP candidates : शिवाजीराव गर्जे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर - Shivajirao Garje

विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council elections ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा असताना तिसरी जागाही लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी सांगितले. पक्षाच्या वतीने शिवाजीराव गर्जे ( Shivajirao Garje ) यांना रिंगणात उतरवत त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असे पाटील म्हणाले.

Jayant Patil
जयंत पाटील

By

Published : Jun 9, 2022, 2:55 PM IST

Updated : Jun 9, 2022, 3:24 PM IST

मुंबई -विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council elections ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या दोन उमेदवारांची नावे अधिकृत रित्या जाहीर केली आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी सांगितले तर, पक्षाच्या वतीने शिवाजीराव गर्जे ( Shivajirao Garje ) यांनाही उमेदवारी देण्यात येणार आहे असेही, ते म्हणाले. तिसरा उमेदवार आम्ही रिंगणात उतरवत आहोत त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असे पाटील यांनी जाहीर केले.

NCP State President Jayant Patil



भाजपचा घोडेबाजाराचा प्रयत्न-सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न भाजपकडून गेल्या दोन वर्षात सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडण्याचा तसेच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न भाजपने चालवल्याचा त्यांनी आरोप केला. ज्या पक्षाची जेवढी ताकद आहे, तेवढे उमेदवार उभे करणं हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकी ( Rajya Sabha elections) अपक्ष उमेदवारांना मतदान दाखवणे बंधनकारक नसल्याने अपक्षांना फोडण्याचा प्रयत्न भाजपने चालवलाय तो अयोग्य असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपद निवडणूक.. आज जाहीर होणार तारीख.. 'अशी' आहे निवडीची प्रक्रिया

Last Updated : Jun 9, 2022, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details