राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुस्तकांसोबत तुला मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईतील वाय. बी. केंद्रावर गर्दी केली आहे. तसेच वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांनी पुस्तकासोबत तुला केली. त्यानंतर सुळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
त्यात काही गैर नाही :भाजपकडून जाणून बुजून शरद पवारांवर शाब्दिक हल्ला केला जात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाहीत अशा प्रकारे हल्ला करणे मला चुकीचे वाटत नाही. लोकशाहीत असे प्रकार व्हायला हवेत. शरद पवारांवर जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत बातमी होत नाही. हे गेले 55 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहेत. त्यामुळे मला त्याच्यात काहीही चुकीचे किंवा वेगळे वाटत नाही. लोक नेहमी आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाभळीच्या झाडांना नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे आणि पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था होणे ही काही मोठी गोष्ट नाही. आपल्या देशाची महागाई कमी होत नाही. त्यामुळे वृत्तपत्रातून सर्वसामान्यांचे हाल होत आहेत हे आपण वाचतो. -सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी
फडणवीस फक्त गॉसिप करण्यात मग्न :राज्याचे उपमुख्यमंत्री शपथविधीतच अडकलेले आहेत. मूळ मुद्द्याला ते हात घालत नाहीत, या राज्यातील प्रत्येक महिलेची जबाबदारी राज्याची गृहमंत्री म्हणून ते घेत नाहीत. महागाई, महिला सुरक्षेबाबत फडणवीस मूग गिळुन बसतात अशी, टीका त्यांनी केली केली आहे. महिला म्हणून आमचे दुःख, महिलांनावरील अत्याचारांविषयी ते काहीच बोलत नाहीत. एखादा विषय निघाला की, विषयाला फाटा देण्यासाठी सरकार नागरिकांचे लक्ष विचलीत करण्याासठी वादग्रस्त मुद्दे हातळतात असा हल्ला सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला आहे. मी स्वतःला सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये इतके व्यस्त ठेवते की मला गप्पा मारायला वेळच मिळत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे राज्यातील सुरक्षेबाबत गंभीर नाहीत, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
देशाचे राजकारण आमच्याशिवाय नाही :भाजपाला शरद पवार, अजित पवार यांचे शिवाय दुसरे काही दिसतच नाही. राज्यातील, देशातील राजकारण बाबा आणि भाऊ यांच्याशिवाय पूर्ण होत नसेल तर, ती आमच्यासाठी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न दिल्लीतून सुरु असल्याचे सुळे म्हणाल्या.
हेही वाचा -MP Supriya Sule birthday : खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक तुला, सोशल मीडियावरुन केले होते आवाहन