मुंबई - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि खासदार सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता सुनील तटकरे नाही तर त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवधूत तटकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाही, तर पुतणे अवधूत शिवसेनेच्या वाटेवर - शिवसेना
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि खासदार सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता सुनील तटकरे नाही तर त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवधूत तटकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
ही सदिच्छा भेट असल्याचे अवधूत तटकरे यांनी सांगितले असले तरी लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. खासदार सुनील तटकरे आणि पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यात वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे यांच्या ऐवजी सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्यामुळे तटकरे बंधूंमध्ये वाद उफाळून आला होता.
तसेच, श्रीवर्धनमधून अवधूत यांच्याऐवजी रायगडाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांना संधी देण्यात येत असल्याचे कळताच अवधूत यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न सुरू केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत अवधूत तटकरे यांनी शिवसेनेचे रवी मुंडे यांचा अवघ्या ७३ मतांनी पराभव केला होता