महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हॉटेल 'रेनिसन्स'मधील राष्ट्रवादीचे आमदार आता 'ग्रँड हयात'मध्ये - राष्ट्रवादीचे आमदार ग्रँड हयात मध्ये

राष्ट्रवादीचे आमदार आता सांताक्रुजयेथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये थांबणार आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोपनीय चर्चा बैठकींचा एक व्हीडीओ समोर आला होता. त्यामुळे सुरक्षेसाठी  आमदारांची जागा बदलण्यात आली आहे.

'रेनिसन्स'येथील राष्ट्रवादीचे आमदार आता 'ग्रँड हयात'मध्ये

By

Published : Nov 24, 2019, 11:35 PM IST

मुंबई - पवईच्या रेनिसन्स हॉटेलमध्ये कालपासून तळ ठोकून असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना पुन्हा एकदा हलवण्यात आले आहे. हे आमदार आता सांताक्रुजयेथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये थांबणार आहेत. रात्री अकराच्या दरम्यान या आमदारांना नवीन ठिकाणाकडे नेण्यात आले.

'रेनिसन्स'येथील राष्ट्रवादीचे आमदार आता 'ग्रँड हयात'मध्ये

हेही वाचा -बहुमत भाजपच सिद्ध करणार; रवी राणा म्हणतात 'ये अंदरकी बात है'

यावेळी आमदारांसोबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफादेखील होता. साधारणतः बारा किलोमीटरचा हा रस्ता असून अर्ध्या तासात या गाड्यांचा ताफा रेनीसन्स हॉटेलमधून सांताक्रूझच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहोचला. आज दुपारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोपनीय चर्चा बैठकींचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे सुरक्षेसाठी आमदारांची जागा बदलण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details