महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Session : पायऱ्यांवरील आंदोलनाला एसपी गटाची दांडी; महाविकास आघाडीत नाराजीनाट्य - farmers issues

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विरोधात पायऱ्यांवर आंदोलन केले. काँग्रेस, ठाकरे गटाने यावेळी आक्रमक पवित्रा घेत, कलंकित सरकार असा नारा देत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या आमदारांनी आंदोलनाला दांडी मारली. महाविकास आघाडीत त्यामुळे नाराजीनाट्य दिसून आले.

Maharashtra Monsoon Session
महाविकास आघाडीत नाराजीनाट्य

By

Published : Jul 17, 2023, 10:46 PM IST

मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पायऱ्यांवरील आंदोलनाने चर्चेत राहीला. सध्या कॉंग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी हातात बॅनर घेऊन, निषेध नोंदवला. खोके सरकार हाय - हाय, खोक्यावर खोके एकदम ओके, सासुची वाटणी केली आणि सासुच वाट्याला आली, आदी घोषणांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला. कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी अग्रस्थानी होते.



एसपी गटाची पाठ : महाविकास आघाडीतील घटक पक्ष राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरतील, असा दावा केला जात होता. परंतु, पहिल्या दिवशी पायऱ्यांवरील आंदोलनाकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठ फिरवली. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह 14 आमदार विधानभवनात उपस्थित असताना, एकही आमदार आंदोलनात सहभागी झाला नाही. विधिमंडळात त्यामुळे चर्चांना उधाण आले. काँग्रेस, ठाकरे गटानेही त्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे.



शरद पवार गट अलिप्त : राज्य विधिमंडळाच्या तोंडावर अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत फूट पडली. जवळपास 37 आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतील, अशी स्थिती होती. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला धारेवर धरले. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी प्रस्ताव फेटाळून लावला. कॉंग्रेस आणि ठाकरे गट सभागृहात यावेळी संतप्त झाला. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गट सर्व घडामोडीपासून अलिप्त राहिल्याचे विधिमंडळाच्या सभागृहात दिसून आले.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar : 'मला कितीही लोक येऊन भेटले तरीही माझ्या भूमिकेत बदल होणार नाही'
  2. Jayant Patil On Sharad Pawar Role: शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही- जयंत पाटील
  3. Uday Samant On Opposition MLA Agitation : शिल्लक राहिलेल्या विरोधक आमदारांच्या आंदोलनात दम नाही - मंत्री उदय सामंत

ABOUT THE AUTHOR

...view details