महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rohit Pawar News: एच3एन2 वर सरकार गंभीर नाही, लोकांचे जीव गेल्यावर सरकारला जाग येणार आहे का- रोहित पवार - रोहित पवार

एच3एन2 व्हायरसने अहमदनगरमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. परंतु सरकार या प्रश्नावर गंभीर नाही. सरकारने तात्काळ कमिटी गठीत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

NCP MLA Rohit Pawar
प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार

By

Published : Mar 15, 2023, 11:47 AM IST

मुंबई :इन्फ्लुएंजा एच3एन2 व्हायरस झपाट्याने पसरत आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, एच३एन२ हा घातक व्हायरस आहे. पण सरकार याबाबत गंभीर दिसत नाही. याबाबत धोरण करायची गरज आहे. हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. मग त्यावर तातडीने उपाय करणे हे सरकारचे काम आहे. पण त्यावर सुद्धा दुर्लक्ष होत आहे. नगरमध्ये मृत्यू सुद्धा झाला आहे. भारतात अनेक राज्यात या व्हायरसने मृत्यू झाले आहेत. याबाबत तत्काळ कमिटी गठीत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कर्नाटकात कमिटी गठीत केली गेली आहे.

सभागृहात मंत्री उपस्थित नाहीत :आमचे सरकार असताना आम्ही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी यशस्वी ठरलो होतो. खाजगी व सरकारी यंत्रणा यासाठी कार्यरत करायला हवी. पण आरोग्य मंत्री याबाबत बैठक घेतली, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी सरकारकडे वेळ नाही. हजारोंच्या संख्येने शेतकरी नाशिकवरून निघाले आहेत, पण त्यांच्याशी चर्चा करायला सरकारकडे वेळ नाही. सभागृहात लक्षवेधी प्रश्नावर उत्तर द्यायला मंत्री सभागृहात हजर नाहीत.

कापूस का आयात केला गेला :आज कापूस शेतकऱ्यांचा २१ कोटींचा कापूस घरात पडून आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आले, त्यांना खुश करण्यासाठी कापूस आयात केला गेला का? हा सुद्धा प्रश्न आहे. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त अर्धे मन आहे व अर्धे मन स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. विधान भवनात पवार बोलत होते. एच3एन2 वर सरकारने अजून गंभीरपणे दखल घेतलेली नाही, लोकांचे जीव गेल्यावर सरकारला जाग येणार आहे का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी यावेळी विचारला. नागपूरमध्ये देखील व्हायरल तापाने थैमान घातले आहे. तथे एक संशयितरीत्या एच3एन2 व्हायरसने मृत्यु झाल्याची बातमी आहे.

हेही वाचा : H3N2 death in Maharashtra : महाराष्ट्रात H3N2 चा पहिला मृत्यू? कोरोनासह इन्फ्लूएंझाची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details