मुंबई - साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या त्यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. उदयनराजेंसाठी तुम्ही साताऱ्यातील जवळच्या लोकांना दुखावले. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळ्यांना पाठीशी घातले. साहेब तुम्हाला काय मिळाले? असा सवाल आव्हाड यांनी शरद पवार यांना केला. तसेच 'यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला' असल्याचेही ते म्हणाले.
'बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं, पोटच्या पोरावाणी प्रेम केलं, सांगा साहेब काय मिळालं' - उदयनराजेंचा भाजप्रवेश
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या त्यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
उदयनराजे भोसले यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती त्यांनी हाती कमळ घेतले. नवी दिल्लीत त्यांचा भाजप प्रवेश झाला. त्यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यावर आव्हाड यांनी टीका केली आहे.
उदयनराजेंवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करुन काय मिळाले? असा सवाल आव्हाड यांनी शरद पवार यांना केला. त्यांच्या सर्व बालिश चाळ्यांना तुम्ही पाठीशी घातले. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. पण तरीही यशवंतरावांचा जिल्हा शरदरावांचा बालेकिल्ला असेही आव्हाड म्हणाले.