मुंबई -कोरोनामुळे देशावर ओढवलेल्या या अभूतपूर्व संकटाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशातील आणि राज्यातील जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
'राष्ट्रवादीच्या सर्वच लोकप्रतिनिधींचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री-प्रधानमंत्री सहाय्यता निधीला'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान सदस्यांनी सदर धनादेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.