मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेच्या घडमोडींनी वेग आला आहे. भाजप शिवसेनेसेह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही बैठकांवर जोर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं सुरु आहेत. आमदार जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
'सिल्व्हर ओक'वर राजकीय खलबतं सुरु, आव्हाडांसह नवाब मलिक पवारांच्या निवासस्थानी - नवाब मलिक आव्हाड पवारांच्या निवासस्थानी
राज्यात सत्ता स्थापनेच्या घडमोडींनी वेग आला आहे. भाजप शिवसेनेसेह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही बैठकांवर जोर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं सुरु आहेत.
'सिल्व्हर ओक'वर राष्ट्रवादीची बैठक
राज्यातील विधानसभेचे निकाल लागून १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप नवीन सरकार स्थापन झाले नाही. कताही केल्या शिवसेना आणि भाजपचा ५०-५० चा वाद मिटण्यास तयार नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता केंद्रस्थानी आले आहेत. भाजपला वगळून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जातेय.