मुंबई -पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सिल्व्हर निवासस्थान राजकारणाचे केंद्रस्थान झाले आहे. शरद पवार हे राजीनाम्यावर ठाम आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाची निवडीकरिता ५ मे रोजी बैठक होणार आहे. समितीची निर्णय मला मान्य असेल, अशी भूमिका शरद पवारांनी घेतल्याचे सूत्राने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या उपस्थित वाय बी सेंटर येथे बैठक सुरू आहे. या बैठीकीसाठी शरद पवार पोहोचले आहेत. बैठकीला सुप्रिया सुळे,अजित पवार, प्रफुल पटेल, बाळासाहेब पाटील, हेमंत टकले व हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.
राज्यात आणि केंद्रात कोण असणार हे अद्याप ठरलेले नाही. आम्ही त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षच राहावे, असे अजित पवार व सुप्रिया सुळे यांचा आग्रह असल्याचे राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण सभागृहातील बैठकीचे जयंत पाटील यांना निमंत्रण नसल्याची माहिती समोर येत आहे. बैठक सुरू असताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून राजीनामा दिला आहे. ठाण्यातील जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि इतर पदाधिकऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांनी काही करून राजीनामा मागे घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.
अध्यक्षपदासाठी आपण उत्सुक नाही- अजित पवार -शरद पवार यांच्या राजीनाम्यानंत जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज व्यक्त भावना व्यक्त केली होती. दुसरीकडे आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तनपुरे, विक्रम काळे, बाबाजी दुर्राणी, उमेश पाटील, तसेच मेहबूब शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक देखील रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीनंतर अजित पवारांकडून सांगण्यात आले की शरद पवार दोन ते तीन दिवस विचार करून आपल्याला सांगणार आहेत. आपण या ठिकाणी गर्दी करू नये तसेच कोणत्या प्रकारचे आंदोलन देखील करू नये असे आवाहन अजित पवारांनी माध्यमासमोर केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी आपण उत्सुक नसल्याचेही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. आपल्या मनात चुकूनही अध्यक्ष पदाचा विचार येत नसल्याचे पवारांनी म्हटले होते.
सुनील तटकरे देवगिरीवर-विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर देखील बैठकांचे सत्र जोरदार पाहायला मिळत आहे. पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे, अनिल पाटील तसेच नवाब मलिक यांच्या मुलीनेही अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे देखील काही वेळापूर्वी अजित पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारणातून निवृत्ती घोषणा केल्यानंतर च्या दुसऱ्या दिवशीही शरद पवार आपल्या दिनचर्याप्रमाणे काम सुरू असल्याचा दिसत आहे.