मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी इंडिक टेल्स या वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. राज्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी भेट घेतली आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले होते. त्यावरुन विरोधी पक्षांनी राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली होती. तो वाद संपत नाही तोच इंडीक टेल्स या वेबासाइटने सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून त्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
कारवाईची मागणी :राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ हे रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून लिखाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. शिवाय इंडिक टेल्स या वेबसाईटवर बंदी आणून काठोर कायेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
समता परिषद आणि राष्ट्रवादी आक्रमक : गेल्या काही महिन्यापासून राज्यांमध्ये महापुरुषांची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. तात्कालीन राज्यपाल भगतसिंग किश्योरी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर विरोधकांनी राज्यपाल हटाव, अशा पद्धतीचा नारा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता एका इंग्रजी वेबसाईटमध्ये समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनासंदर्भात आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेकडून निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेने मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर निदर्शने करत आंदोलन केले. आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे याप्रकरणी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ही वेबसाईट बंद करण्यात यावी तसेच लिखाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट : राज्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी भेट घेतली. सावित्रीबाई फुले यांच्या बदनामी केल्याप्रकरणी शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट, श्री भारद्वाज, नीना मुखर्जी यांच्यावर कारवाई करावी. याचबरोबर पोर्टलवर बंदी आणावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.