मुंबई -आम्ही याच मातीतील लोक आहोत. आम्ही सर्वधर्मीय समता बाळगणारे लोक आहोत. आम्हीच खरे भारतीय आहोत. मात्र, आम्हाला मोदी-शाह हे भारतीय असल्याचा पुरावा मागत आहेत. या देशाचे आम्ही मूळ नागरिक असल्याने मोदी-शाह यांना आम्ही भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.
भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा अधिकार मोदी-शाहांना नाही - विद्या चव्हाण - नागरिकत्व सुधारणा कायदा
हा देश गांधी आणि आंबेडकर यांचा आहे. त्यामुळे कोणी संविधानाचा अवमान केला, तर आम्ही खपवून घेणार नाही. या देशाला गांधी यांनी स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ पाहत आहे, असा आरोपही विद्या चव्हाण यांनी केला
हा देश गांधी आणि आंबेडकर यांचा आहे. त्यामुळे कोणी संविधानाचा अवमान केला, तर आम्ही खपवून घेणार नाही. या देशाला गांधी यांनी स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ पाहत आहे, असा आरोपही विद्या चव्हाण यांनी केला. हेच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी आज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी गांधी शांती यात्रेला सुरुवात केली. त्या माध्यमातून देशात पुन्हा एकदा परिवर्तन होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज दीडशे वर्ष झाले. मात्र, गांधीजींचा विचार कोणीही पुसू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.