मुंबई - राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर 4 जणांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्यावर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित, आनंद आणि आनंद यांच्या पत्नी अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.