मुंबई - मला उभं आडवं चिरलं तरीसुद्धा माझ्या हदयात फक्त शरद पवारच आहेत. शरद पवार हेच माझे दैवत असून, त्यांच्याशिवाय दुसरे कोणतेही दैवत असू शकत नाही. असे वक्तव्य अजित पवार यांनीच केले असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सांगितले. उमेश पाटील यांनी अजित पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
'उभं आडवं चिरलं तरीसुद्धा माझ्या हदयात फक्त शरद पवारच' - Umesh patil meet ajit pawar
मला उभं आडवं चिरलं तरीसुद्धा माझ्या हदयात फक्त शरद पवारच आहेत. शरद पवार हेच माझे दैवत असून, त्यांच्याशिवाय दुसरे कोणतेही दैवत असू शकत नाही. असे वक्तव्य अजित पवार यांनीच केले असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सांगितले.
!['उभं आडवं चिरलं तरीसुद्धा माझ्या हदयात फक्त शरद पवारच'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5165612-thumbnail-3x2-oaoaoa.jpg)
अजित पवार
अजित पवरांना भेटण्यासाठी नेत्यांची गर्दी
अजितदादा हे राष्ट्रवादीसोबतच असल्याचे उमेश पाटील म्हणाले. जे घडतंय त्या संदर्भात लवकरच अजित पवार स्वत: प्रसारमाध्यांशी बोलणार असल्याचे उमेश पाटील म्हणाले. उमेश पाटील यांच्याबरोबर अपक्ष आमदार रवी राणा तसेच आमदार विनय कोरे, आमदार निरंजन डावखरे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, भाजप नेते बबनराव पाचपुते यांनीही त्यांची भेट घेतली.
अजित पवार आणि माझे जुने संबध आहेत. ते एक मजबूत नेते असून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी येथे आलो असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.
Last Updated : Nov 25, 2019, 3:34 AM IST
TAGGED:
Umesh patil meet ajit pawar