महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपचार मिळत नसल्याने कोरोनाचे रूग्ण मरत आहेत; शशिकांत शिंदे यांचा सरकारला घरचा आहेर - शशिकांत शिंदे सरकारविरोधी वक्तव्य

ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती बिकट बनली आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 80 टक्के लोक कोरोनामुळेच मरत आहेत. नागरिकांना वाचवण्यासाठी जे काही करता येईल, ते करा. परंतु लोक मरणार नाहीत, यावर काम करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केली.

Shashikant Shinde
शशिकांत शिंदे

By

Published : Sep 8, 2020, 5:15 PM IST

Updated : Sep 8, 2020, 5:22 PM IST

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे उपचार मिळत नसल्याने लोक मरत आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजन नाही तर काही ठिकाणी व्हेंटिलेटर मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती बिकट बनली आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 80 टक्के लोक कोरोनामुळेच मरत आहेत. नागरिकांना वाचवण्यासाठी जे काही करता येईल, ते करा. परंतु लोक मरणार नाहीत, यावर काम करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चे दरम्यान केली.

राज्यात खासगी रुग्णालये रुग्णांची भरमसाठ लूट करत आहेत. माणसांच्या मरणावर व्यवसाय करणारी टोळी उभी राहिली असून त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. लोकांची लूट थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. लूट करणाऱ्या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करा, अशी मागणीही शिंदे यांनी यावेळी केली.

Last Updated : Sep 8, 2020, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details