मुंबई :येत्या काळामध्ये केंद्रीय एजन्सीच्या नावाने, पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या पद्धतीने राज्यांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केला गेला. तो देशाने पाहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील नोटीस पाठवली आहे. आम्ही कायदेशीरपणे लढा देवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रिस्टो यांनी दिली आहे
कायदेशीर लढा देऊ :ईडीकडून जयंत पाटील यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. अशाच प्रकारच्या नोटीसा आणखी लोकांना आल्या आहेत. आम्ही सर्व वाट बघत आहोत. अजून कधी आणि केव्हा किती लोकांना नोटीस येतील. यावरून हे लक्षात येत आहे, सत्तेचा गैरवापर हा वारंवार केला जात आहे. या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई करू, अशा प्रकारचा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. संविधानाची ज्यांच्यावर जबाबदारी असते, त्यांनी त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे.
चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश :राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय गुरूवारी सुप्रीम कोर्टात घोषित करण्यात आला. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे. आयएएल आणि एफएलएसच्या संदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला जात आहे. उद्या ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याबाबतचा आदेश नोटीसमध्ये दिला असल्यास समजते. मला याबाबत कोणती नोटीस मिळाली नसल्याचे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
राज्यपाल नियुक्ती :आपल्या देशात राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राज्याला लाभलेले राज्यपाल आहे. ते जेव्हा इथे होते, तर मी जाहिरपणे बोललो आहे. संविधानात राज्यपाल हे एक इन्स्टिट्युशन आहेत. एक लक्ष ठेवून राज्यपालांची निवड केली जाते. जाणीवपूर्वक तिथल्या स्थानिक अन्य राष्ट्रीय विचारांचे लोकप्रतिनिधींना किंवा संस्थेला त्रास कसा होईल, ही भूमिका घेऊन या नियुक्त्या केल्यानंतर असा प्रकार पाहायला मिळतो.