महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात - जितेंद्र आव्हाड - Jitendra Awhad criticizes BJP

शिवसेना नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या भांडुप येथील 'मैत्री' निवासस्थानी विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थिती दर्शवली.

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड

By

Published : Nov 15, 2019, 1:54 PM IST

मुंबई - 'ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात,' अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलारांवर केली. शिवसेना नेते संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत शिवसेनेचे निष्ठावंत नेते असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात


शिवसेना नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या भांडुप येथील 'मैत्री' निवासस्थानी विविध पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थिती दर्शवली.

हेही वाचा - शेतकऱ्यांची गंभीर स्थिती सरकारच्या कानावर घालून मदतीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार

'संजय आणि माझी मैत्री 28 वर्षांपासून असून ते मला वरिष्ठ आहेत. संजय राऊत आणि मी टोकाची भूमिका मांडतो त्यामुळे आम्ही बरेचदा अडचणीत येतो. राज्यातील सत्ता स्थापनेच्या आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू आहेत', अशी माहिती आव्हाडांनी दिली.

गुरूवारी भाजप नेते नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या खेळात आणि राजकारणात काहीही होऊ शकते, असे गुरुवारी वक्तव्य केले. यावर गडकरी कदाचित शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे येतील असे आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details