मुंबई - पंतप्रधान आज १५ हजार बूथ प्रमुखांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधणार आहेत. पंतप्रधानांना जवानांपेक्षा त्यांच्या पक्षाचे हित जास्त महत्वाचे वाटत आहे, अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधानांना जवानांपेक्षा पक्षाचे हित महत्वाचे - जयंत पाटील - हवाई हल्ला
पंतप्रधानांना जवानांपेक्षा पक्षाचे हित महत्वाचे आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अभिनंदन वर्धमानला लवकरात लवकर भारतात परत आणायची गरज आहे, असेही ते म्हणाले.
जयंत पाटील
ते म्हणाले, की अभिनंदन हा पाकिस्तान विरुद्ध कारवाई करत असताना पाकिस्तानी हद्दीत पडला. त्याला पकडण्यात आले आहे. पाकिस्तानने त्याला मारहाण केली. मात्र, पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला त्यांने निर्भीडपणे उत्तर दिली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अभिनंदला लवकरात लवकर परत आणायची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, मात्र, पंतप्रधानांना जवानांपेक्षा त्यांच्या पक्षाचे हित महत्वाचे वाटते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.