महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil criticize To Governor फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीच्या डीएनएमध्ये, जयंत पाटलांचा राज्यपालांवर हल्लाबोल - जयंत पाटलांचा राज्यपालांवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील ( NCP Leader Jayant Patil criticize To Governor ) यांनी राष्ट्रवादीच्या ( Nationalist Congress Party ) डीएनएमध्ये फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोहींचा काळ सुरू असल्याचा जोरदार हल्लाबोल राज्यपालांवर ( Governor Bhagat Singh Koshyari ) केला. राज्यातून जाण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही पत्र लिहिताय, असा सवालही त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केला.

Jayant Patil criticize To Governor
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील

By

Published : Dec 13, 2022, 6:18 PM IST

मुंबई - सध्या एका विचित्र कालखंडातून आपण सर्वजण जात आहोत. शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार ( MVA Government ) आले होते. महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे ते सरकार होते, फुले - शाहू - आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले. हाच विचार आपल्या राष्ट्रवादीच्या ( Nationalist Congress Party ) डीएनएमध्ये आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP Leader Jayant Patil criticize To Governor ) यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

महाराष्ट्र द्रोहींचा काळ - सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोहींचा काळ सुरू आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chhatrapati Shivaji Maharaj ) बदनामी करण्याचे काम हाती घेतले आहे की काय. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपले महापुरुष आपले भूषण आहे, आपला गौरव आहेत मात्र त्यांच्याबाबत अपमान केला जात आहे. महापुरुषांना कमी लेखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

राज्यपालांनी जाण्याची वेळ आल्यावर लिहिले पत्र -राज्यपालांनी ( Jayant Patil criticize To Governor Bhagat Singh Koshyari ) आज दोन महिन्यानंतर केंद्रीय गृहमंत्री ( Union Home Minister Amit Shah ) यांना पत्र लिहिले आहे. इतका वेळ लागला? जाण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही पत्र लिहिताय ? तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात जे काम केले, ते महाराष्ट्राला डिवचण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यपालांना स्वीकारत नाही, असे समोर आल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

शाई फेकली त्याचे आम्ही समर्थन करत नाही - चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) यांच्यावर शाई फेकली त्याचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र त्या तरुणावर किती कलमे लावली ? इतका अन्याय ? मूळ मुद्दा बाजूला घालवण्यासाठी हे सर्व केले जात आहे असेही जयंत पाटील म्हणाले. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले, विकासाला आमचा विरोध नसतो. अर्थमंत्री असताना अजित पवार ( Opposition Leader Ajit pawar ) यांनी या महामार्गासाठी भरघोस निधी दिला. महाविकास आघाडी सरकारचेही या महामार्गाच्या निर्मितीत योगदान आहे हेही आवर्जून जयंत पाटील यांनी सांगितले. आपण वर्षभर १२ डिसेंबरची वाट बघत असतो. शरद पवार यांचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी उत्सवच आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणले जे शाहू- फुले - आंबेडकर यांच्या विचारांची कास धरणारे होते, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details