महाराष्ट्र

maharashtra

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

By

Published : Jun 22, 2020, 5:45 PM IST

Published : Jun 22, 2020, 5:45 PM IST

Updated : Jun 22, 2020, 7:21 PM IST

ncp leader dhananjay munde  discharge from brach candy hospita in mumbai
धनंजय मुंडेंची कोरोनावर मात

बीड - सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज (सोमवारी) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याना डिस्चार्ज देण्यात आला. धनंजय मुंडे यांनी कोणावर मात केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
मागील 11 दिवसांपासून धनंजय मुंडे या रुग्णालयात कोरोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना देखील काही दिवस क्वारंटाईन रहावे लागले होते. अखेर मंत्री मुंडे यांनी कोणावर मात केली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

धनंजय मुंडे राज्याच्या मंत्रीमंडळातील कोरोनाची लागण झालेले तिसरे मंत्री होते. त्यांच्या आधी ृराष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे नेते सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडे हेही कोरोनामुक्त झाले आहेत.

Last Updated : Jun 22, 2020, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details