मुंबई - 'आता आम्ही थकलो' असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा काँग्रेस असो. पक्ष कधीही थकत नसतो. पक्ष त्याची वाटचाल पुढे करतच राहणार असल्याचे पवार म्हणाले.
सुशीलकुमार शिंदेच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार? - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार
'आता आम्ही थकलो' असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुशीलकुमार शिंदे, अजित पवार
गेल्या ५ वर्षात भाजप सरकारने अनियोजित राज्यकारभार केला आहे. या सरकारच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. महिला सुरक्षा, शेतमालाला भाव, उत्पादक-ग्राहक असमाधानी, शेतकरी कर्जमाफी, वंचित-मागास-भटक्या-आदिवासी जमातींना योजनांचा लाभ न मिळणं अशा अनेक मुद्यांवर सरकारने दुर्लक्ष केले असल्याचे अजित पवार म्हणाले.