पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीविरोधातील सार्वजनिक आंदोलन शांततेच्या मार्गाने हाताळण्याचे आवाहन केले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाचा वाद चिघळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विकासकामांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका तुम्ही ऐकलीच असेल. पण वातावरण बिघडत असेल तर प्रकल्पाचा फेरविचार व्हायला हवा, असं अजित पवार म्हणाले.
प्रकल्पाचा पुनर्विचार झाला पाहिजे :माझ्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी मला काल सांगितले की एकही घर आम्हा तोडत नाहीत. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा, इतर राज्यातील लोकांनी जमिनी घेऊन तिथे ठेवल्याच्या बातम्याही आपण ऐकत आहोत. स्थानिकांना फायदा होणार असेल तर तो स्थानिकांसाठीच व्हायला हवा असे, अजित पवार म्हणाले, 'नुकसान होणार असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल, तर प्रकल्पाचा पुनर्विचार झाला पाहिजे' अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.