महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमुकल्यांच्या मृत्यूंसाठी मुंबई महापालिकेविरोधात 302 चा गुन्हा दाखल करा - जयंत पाटील - मुंबई महानगरपालिका

गेल्या 10 वर्षात 3 लाख कोटी रुपयांचे बजेट महापालिकेने मंजूर करून घेतले आहे. मात्र, शहरातील कचऱ्याची, गटारांची काळजी घेतली नाही. त्यामुळे हे 3 लाख कोटी रुपये गेले कुठे? असा सवालही जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील

By

Published : Jul 15, 2019, 11:49 PM IST

मुंबई- धारावी परिसरातील एका नाल्यात पडून एका 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचा निषेध करत मुंबई महानगरपालिकेवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

गेल्या 10 वर्षात 3 लाख कोटी रुपयांचे बजेट महापालिकेने मंजूर करून घेतले आहे. मात्र, शहरातील कचऱ्याची, गटारांची काळजी घेतली नाही. त्यामुळे हे 3 लाख कोटी रुपये गेले कुठे? असा सवालही जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभाराने कळस गाठला आहे. आज 7 वर्षीय अमीत जैस्वाल या चिमुरड्याचा गटारात पडून मृत्यू झाला आहे. दिव्यांशू सिंग हा 3 वर्षांचा चिमुरडा गोरेगावमधून ५ दिवसांपासून बेपत्ता आहे. बबलू कुमार या १२ वर्षीय मुलाचा वरळी येथील कोस्टल रोडच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. मागील २ वर्षांपूर्वी दिपक अमरापुरकर या बॉम्बे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचा असाच पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. या सर्व मृतांची जबाबदारी पालिकेने घेतली पाहिजे, अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details