महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीला ५१ पारची अपेक्षा; धनंजय मुंडे यांच्या विजयाबद्दल साशंकता - Mumbai Nationalist Congress News

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून यावेळी राष्ट्रवादीला ५१ हून अधिक जागा मिळतील असा या पक्षाला विश्वास आहे. राष्ट्रवादीला ज्या जागांवर हमखास यश मिळणार आहे त्या जागा राष्ट्रवादीने निश्चित केल्या आहे. मात्र त्यात परळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विजयाबद्दल राष्ट्रवादीच्या गोटात साशंकता निर्माण झाली आहे.

विश्वास वर्पे

By

Published : Oct 23, 2019, 8:39 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून यावेळी राष्ट्रवादीला ५१ हून अधिक जागा मिळतील, असा या पक्षाला विश्वास आहे. तर राष्ट्रवादीला ज्या जागांवर हमखास यश मिळणार आहे त्या जागाही राष्ट्रवादीने निश्चित केल्या आहे. मात्र त्यात परळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विजयाबद्दल राष्ट्रवादीच्या गोटात साशंकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे रविकांत वर्पे यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ११७ जागांवर उमेदवार उभे करूण सेना-भाजपा आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना आव्हान देण्यात आले आहे. त्यातच राष्ट्रवादीला मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादीला कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे बीड, जळगाव, सोलापूर, रायगड, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यांमध्येही अर्ध्याहून अधिक यश मिळेल, असा अंदाज राष्ट्रवादीकडून बांधण्यात आला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील युवकांनी कधी नव्हे इतका मोठा प्रतिसाद राष्ट्रवादीला दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांना कार्यकर्त्यांनी नाही तर हजारो तरुणांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे यावेळची निवडणूक सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल, असा विश्वास वर्पे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-वरळीत 1 लाख 29 हजार मतदान; आदित्य ठाकरेंना सव्वालाख मतं मिळण्याचा दावा ठरणार फोल

राष्ट्रवादीची मदार पुढील जिल्ह्यांवर आहे

जिल्हा व अपेक्षीत जागा

पुणे- जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, मावळ, बारामती, मावळ
सातारा- वाई, कोरेगाव, कराड उत्तर,
सोलापूर- पंढरपूर, माढा
कोल्हापूर- चंदगड, राधानगरी, कागल, इस्लामपूर, तासगाव- कवठे-महाकांळ
अहमदनगर - शेवगाव, पारनेर, नगर शहर, कर्जत-जामखेड
बीड- गेवराई, माजलगाव, बीड, केज,
लातूर- उदगीर, अहमदपूर
मुंबई- अणुशक्ती नगर

ABOUT THE AUTHOR

...view details